आधी ‘पद्मावती’ बघा मगच विरोध करा- नाना

आधी ‘पद्मावती’ बघा मगच विरोध करा- नाना Published On: Nov 23 2017 10:56AM | Last Updated: Nov 23 2017 11:05AM आधी ‘पद्मावती’ बघा मगच त्याला विर

आधी ‘पद्मावती’ बघा मगच विरोध करा- नाना
Published On: Nov 23 2017 10:56AM | Last Updated: Nov 23 2017 11:05AM


आधी ‘पद्मावती’ बघा मगच त्याला विरोध करा, असे सांगत; कोणी कोणाला उगाच टार्गेट करत नाही. जोपर्यंत मी काही करत नाही तोपर्यंत समोरचा काही करत नाही, अशा शब्दात नाना पाटेकर यांनी संजय भन्साळी यांचा समाचार घेतला. गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नाना बोलत होते.

भन्साळी हे कशा प्रकारचे दिग्दर्शक आहेत हे सर्वांना माहीतच आहे. त्यामुळे आधी त्यांचा चित्रपट पाहाव मगच विरोध करावा, असे नाना म्हणाले. कधीही कोणालाही कशाही प्रकारची धमकी देणे योग्य नाही. पण एक कलाकार म्हणून माझीही जबाबदारी असते. त्यामुळे ही गोष्ट दोन्ही बाजूच्या लोकांनी समजून घेतली पाहिजे. ‘पद्मावती’वरून प्रत्येक जण स्वत:ची मते देत आहे. सेन्सॉर बोर्डाची मंजूरी मिळण्याआधीच पत्रकारांना चित्रपट दाखवण्यात आल्यामुळे प्रसून जोशी नाराज आहे. तर दुसरीकडे जोपर्यंत चित्रपट रिलीज होत नाही तोपर्यंत वाद निर्माण करणे चुकीचे असल्याचे भन्साळी यांचे मते आहे. मला हेच कळत नाही की एखादा चित्रपट न पाहता त्याला विरोध कसा काय केला जातो, असे नाना म्हणाले.

कोणाला मारण्याचा मला अधिकार नाही

‘पद्मावती’ चित्रपटातील कलाकारांना धमकी दिली जात आहे. यावर नानांनी नाराजी व्यक्त केली. लोक ज्या प्रकारची भाषा वापरत आहेत, ते अयोग्य आहे. जर मी कोणाला आयुष्य देऊ शकत नाही तर त्याला मारण्याचा देखील मला अधिकार नाही. याआधी ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटावरून देखील वाद झाला होता. मला स्वत:ला हा चित्रपट आवडला नाही. मात्र मी कोणाला मारण्याचा विचार देखील करू शकत नाही, असे नानांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0