‘लोकराज्य’च्या विशेषांकाचे पालकमंत्री शिवतारे यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न

सातारा : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने ‘आपले जिल्हे विकासाची केंद्रे’ हा लोकराज्य विशेषांक काढण्यात आला आहे. या विशेष अंकाचे प्रकाशन आज प

GST जीएसटी क्या कृषि क्षेत्र का राष्टीय लक्ष्य हासिल कर सकेगी ?
भिलारसारखे पुस्तकाचे गाव नवी मुंबई परिसरात व्हावे – आमदार मंदा म्हात्रे
महाराष्ट्राची लोककला देशाला भुरळ पाडणारी – केंद्रीय राज्यमंत्री आठवले


सातारा : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने ‘आपले जिल्हे विकासाची केंद्रे’ हा लोकराज्य विशेषांक काढण्यात आला आहे. या विशेष अंकाचे प्रकाशन आज पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आले.

येथील श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुलात झालेल्या प्रकाशन सोहळ्यास खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर, नगराध्यक्ष डॉ. माधवी कदम, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रांताधिकारी स्वाती देशमुख-पाटील, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) देविदास कुलाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) पुनिता गुरव, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आदी उपस्थित होते.

आपले जिल्हे-विकासाची केंद्र या लोकराज्य विशेषांकात महाराष्ट्राच्या या स्थित्यंतराची दखल घेतली आहे. प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या, पूर्णत्वास गेलेल्या व नजीकच्या काळात सुरु होणाऱ्या विविध योजना व विकास कामांचा आढावा या विशेषांकात घेतला आहे. तसेच सातारा जिल्ह्यात झालेले आदर्श पुनर्वसन, जलयुक्त शिवार अभियानाचे यश व स्वच्छतेत प्रथम या विषयांची माहिती या लोकराज्य अंकात देण्यात आलेली आहे. तसेच सातारा जिल्ह्याची राज्यातच नव्हे तर देशात ओळख होत असलेल्या ‘पुस्तकाचं गावं भिलार’ यावरही यात विशेष प्रकाश टाकण्यात आला आहे.

‘महान्यूज’ मधील मजकूर आपण ‘महान्यूज’च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0